बीव्हीजी हेरिटेज वॉक - 7
02-04-2023
पु.ल.देशपांडे उद्यान
मार्गदर्शन : श्री. ज्ञानेश राठोड आणि सायली ढोले
बीव्हीजी इंडिया लि.,क्लब हेरिटेज पुणे आणि एच.व्ही.देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल रोजी 'पु.ल.देशपांडे' उद्यान येथे हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला आहे.महारष्ट्र टाइम्स या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.
यावेळी पर्यावरणशास्त्र विभागाचे अभ्यासक श्री. ज्ञानेश राठोड आणि सायली ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा हेरिटेज वॉक होणार आहे. ज्ञानेश राठोड हे एच.व्ही. देसाई महाविद्यालयात पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख होते. प्रा सायली ढोले एच.व्ही. देसाई महाविद्यालयात पर्यावरण शास्त्र विभागात व्याख्यात्या आहेत. पु.ल.देशपांडे उद्यान जपानी पद्धतीवर आधारित आहे. या उद्यानाच्या उभारणीत मोलाचे योगदान असणारे श्री.यशवंत खैरे हे याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
बाग,बागेतील वनश्री,पर्यावरण या विषयी माहिती दिल्यावर झाडांची उंची मोजण्याचे तंत्रज्ञान,झाडांचे वय मोजण्याचे शास्त्र या विषयी माहिती दिली जाणार आहे. वृक्षगणतेचे तंत्र समजावून सांगितले जाणार आहे. या कामासाठीची यंत्रे विशेषतः जीपीएस,रेंज फाइंडर,टेप या साधनांच्या आधारे झाडाची उंची मोजून दाखविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे.