बीव्हीजी हेरिटेज वॉक - 5
19-03-2023
नाना वाडा
मार्गदर्शक : इतिहासाचे अभ्यासक श्री मोहन शेटे
काय पाहिले ?
-
२३ मार्च हा भगतसिंग सुखदेव व राजगुरू या वीरांचा हौतात्म्य दिन! राजगुरू न्यू इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी असताना नानावाडा येथे शिकत होते. त्यांच्या स्मृती जपणा-या वास्तू मधे त्यांच्या आठवणी तसेच हुतात्मा भाई कोतवाल यांच्या ही आठवणी सांगितल्या गेल्या.
-
भले बुद्धी चे सागर… नाना, असे ज्यांचे वर्णन केले जाते अशा मुत्सद्दी नाना फडणीस यांच्या कर्तृत्वाबद्दल व त्यांच्या पेशवेकालीन वाड्याबद्दल माहिती दिली गेली.
-
बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस यांच्या इ.स.१७८० साली स्वतःकरता बांधलेल्या शनिवार वाड्याच्या मागील बाजूस बांधलेल्या वाड्यास नाना वाडा असे म्हणतात. पेशवेकालीन आणि ब्रिटिशकालीन बांधकामांचा संगम या वास्तूमध्ये आहे.
-
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलचे वर्ग एप्रिल इ.स. १८८२ ते डिसेंबर इ.स. १९५३ या काळात नानावाड्यात भरत. १९०७ मध्ये ब्रिटिशकाळात या वाड्याच्या मागील भागात न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची इमारत बांधण्यात आली.