top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 4
12-03-2023

राजा दिनकर केळकर संग्रहालय

मार्गदर्शक : इतिहासाचे अभ्यासक श्री अजित आपटे​

काय पहाल ?

  • याप्रसंगी ​इतिहासाचे अभ्यासक श्री अजित आपटे​ संग्रहालयाची माहिती दिली. संग्रहालयाचे संस्थापक दिनकरराव केळकर यांच्या कार्याची माहिती त्यांचे वारस आणि ​संग्रहालयाचे प्रमुख श्री सुधन्वा रानडे​ यांनी दिली. 

  • राजा दिनकर केळकर संग्रहालय हे पुणे शहरातील एक नामांकित वस्तुसंग्रहालय आहे. हे संग्रहालय सन. १८९६ ते १९९० च्या पुण्यभूषण पद्मश्री डॉ. दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी यांनी  उभारले. संग्रहालयाला दिनकर केळकर यांच्या राजा नावाच्या अल्पावयात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव दिले आहे. या संग्रहालयाची सुरुवात सन १९२० मध्ये झाली. आपले पिढीजात चष्म्याचे दुकान चालवताना दिनकर केळकरांना जुन्या सरदार घराण्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू जमवण्याचा छंद जडला. अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत त्यांनी रोजच्या वापरातील नाना चीजा जमा केल्या. विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजीफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाने, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या अशांनी केळकरांचा खजिना समृद्ध, संपन्न होऊ लागला. कोथरूड येथून त्यांनी मस्तानीचा महाल उचलून आणला आणि संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला. १९२२ साली एका खोलीत सुरू झालेले हे संग्रहालय, वाड्याच्या साऱ्या दालनांतून वाढवले गेले. राणी एलिझाबेथ यांनीही संग्रहालयातले हे वस्तुवैभव पाहून आनंदोद्गार काढले होते. 

       Source: Wikipedia 

  • BVG India Limited महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यभरात १०८ ची आपत्कालीन अँब्युलन्स सेवा (MEMS) प्रदान करत आहे, हे आपण जाणताच. BVG ने या अंतर्गत आतापर्यंत ८० लाख पेक्षा जास्त रुग्णांना अडचणीच्या काळात मदत करून जीवनदान दिले आहे. सध्या वाढत असलेले हार्ट अटॅक चे प्रमाण पाहता, सर्वांना प्राथमिक उपचाराविषयी माहिती व्हावी या उद्देशाने, BVG समूहाचे अध्यक्ष चे श्री हणमंतराव गायकवाड यांच्या इच्छेनुसार, हेरिटेज वॉकच्या सहभागी सदस्यांसाठी १० ते १५ मिनिटांचे First Responder Training आयोजित केले होते.

बीव्हीजी हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png
bottom of page