top of page
बीव्हीजी हेरिटेज वॉक - 46
07-12-2023
नदीकाठचे पुणे
मार्गदर्शक : श्री. मंदार लवाटे
रविवार, ०७ जानेवारी २०२४ रोजी, सकाळी ११ वाजता ‘नदीकाठचे पुणे’ या हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहरातील नदीपात्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुठा नदीच्या काठावरील ऐतिहासिक वास्तूंची माहिती या वॉकमध्ये देण्यात येईल. या वॉकमध्ये श्री. मंदार लवाटे प्रमुख वक्ते असतील.
मुठा नदीकाठच्या वास्तूंना चित्तवेधक असा इतिहास आहे. यादवकाळापासून मुठा नदीकाठी घाट बांधण्यात आले होते. नेने घाट, आपटे घाट, धोबी घाट, राजे बहाद्दर घाट अश्या पेशवेकालीन घाटांचे काही अवशेष आजही अस्तित्वात आहेत. तसेच अमृतेश्वर, सिद्धेश्वर आणि ओंकारेश्वर ही ऐतिहासिक मंदिरेदेखील आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी गंगाधर रघुनाथ केळकर यांची समाधीदेखील आहे.
एच. व्ही. देसाई महाविद्याल : गुगल लोकेशन
bottom of page