बीव्हीजी हेरिटेज वॉक - 45
30-12-2023
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
मार्गदर्शक : महेंद्र वाघ, सदानंद कुलकर्णी, विकास देशपांडे, पल्लवी बसाळे, प्रदीप वाजे
१०४ वर्षांच्या आयुष्यात सलग ७५ वर्षे स्त्री शिक्षणाच्या कार्यात खर्च करणारे महर्षी कर्वे यांचे कार्य जाणून घेण्याची संधी शनिवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था येथे हेरिटेज वॉक मध्ये मिळणार आहे.
स्वतंत्र भारतातील पहिल्या सरकारने भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी पहिल्याच वर्षी निवडलेल्या तीन व्यक्तींमध्ये एक होते महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांच्याशी निगडित असणारे संग्रहालय आणि संग्रहालयातील भारतरत्न पदक, समाधी दर्शन, अण्णांची कुटी इत्यादी गोष्टी या दाखविण्यात येणार आहेत. याच्या जोडीला संस्थेतील विविध प्रकल्प, नव्या जुन्या संस्था यांची माहिती देण्यात येणार आहे. विधवा विवाहोत्तेजक मंडळी, अनाथ बालिकाश्रम मंडळी, महिला विद्यालय, भारतवर्षीय महिला विद्यापीठ, महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ, समता संघ यांचे कार्य जाणून घेता येईल.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील महेंद्र वाघ ,सदानंद कुलकर्णी, विकास देशपांडे, पल्लवी बसाळे, उपसचिव वाजे प्रदीप हे माहिती देणार आहेत. संग्रहालयापासून हेरिटेज वॉक सुरू होणार आहे .
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था : गुगल लोकेशन