बीव्हीजी हेरिटेज वॉक - 43
16-12-2023
पंचहौद मिशन - पवित्र नाम देवालय
मार्गदर्शक : श्री. मनोज येवलेकर आणि श्री. भूषण तळवलकर
पंचहौद हे पुण्यातील पहिले मराठी चर्च आहे. पवित्र नाम देवालय असे नामकरण असलेल्या या वास्तूची रचना ७ ऑगस्ट, इ.स. १८८५ रोजी झाली. तीस २०१० मध्ये १२५ वर्षे पूर्ण झाली. गुरुवार पेठेतील ही वास्तू पंचहौद मिशन या नावानेही ओळखली जाते.
१६ डिसेंबर २०२३ रोजी, शनिवारी, सकाळी ९.३० वाजता पुणे शहरातील प्रख्यात अशा चर्च ऑफ द होली नेम (पवित्र नाम देवालय, पंचहौद मिशन, गुरुवार पेठ) येथे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी श्री. मनोज येवलेकर, सचिव, पवित्र नाम देवालय आणि श्री. भूषण तळवलकर श्रोत्यांस माहिती देणार आहेत.
याप्रसंगी चर्चचा इतिहास, चर्चच्या आजवरच्या वाटचालीतील महत्त्वाच्या घटना, चर्चचे अंतर्गत स्थापत्य, चर्चमधील विविध महत्त्वाच्या जागा, चर्चमधील परंपरा, चर्चच्या माध्यमातून आयोजित केले जाणारे समारंभ, चर्चचे कार्य, ऐतिहासिक दफ्तर, चर्चशी संलग्न असणाऱ्या सामाजिक संस्था आणि त्यांचे उपक्रम याची माहिती पवित्र नाम देवालयाचे सचिव श्री. येवलेकर देणार आहेत. श्री. भूषण तळवलकर चर्चचे बाह्य स्थापत्य, बेल टॉवर, त्यात असणाऱ्या ८ सुरांच्या घंटा यांची माहिती देणार आहेत. बेल टॉवरमधील घंटांवर राष्ट्रगीत वाजवितानाचे रेकॉर्डिंग दाखविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी श्री. उमेश पोटे (९७६२०९२३३२) यांच्याशी संपर्क साधावा.
पंचहौद मिशन: गुगल लोकेशन