बीव्हीजी हेरिटेज वॉक - 42
09-12-2023
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था
मार्गदर्शक : श्री श्रीनंद बापट व श्री भूपाल पटवर्धन
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही महाराष्ट्रामधील पुणे शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे .पुण्यातील भांडारकर रस्ता किंवा विधी महाविद्यालय रस्त्यावर ६ जुलै १९१७ रोजी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संशोधन संस्था आहे. ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत.
प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा.ना. दांडेकर यांनी ५४ वर्षे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदाची धुरा सांभाळली होती. संस्थेच्या डॉ. रा.ना. दांडेकर ग्रंथालयामध्ये भारतीय आणि युरोपियन भाषेतील सव्वा लाख पुस्तकांचा समावेश असून त्यापैकी २० हजार पुस्तके दुर्मिळ आहेत. प्राकृत शब्दकोश हा महत्त्वपूर्ण प्रकल्प संस्थेने पूर्णत्वास नेण्याकडे वाटचाल केली आहे. केवळ अभ्यास आणि संशोधन या कार्यालाच वाहून घेतलेल्या अभ्यासकांची पिढी घडविण्याचे कार्य संस्थेने केले आहे. सौजन्य : विकिपीडिया
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था: गुगल लोकेशन