बीव्हीजी हेरिटेज वॉक - 41
03-12-2023
बालभारती
मार्गदर्शक : श्री. कृष्णकुमार पाटील व श्री. किरण केंद्रे
आपल्या बालपणीची पाठ्यपुस्तके बघायला कोणाला आवडणार नाही. चला तर मग पन्नास वर्षांपूर्वीची पाठ्यपुस्तके बघायला. पुन्हा एकदा शालेय जीवनातला भूतकाळ अनुभवायची संधी दिली आहे, बालभारतीने ०३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता बालभारती येथे हेरिटेज वॉक आहे. याप्रसंगी बालभारतीचे संचालक श्री. कृष्णकुमार पाटील आणि किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक श्री. किरण केंद्रे श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत.
याप्रसंगी ‘बालभारती इयत्ता पन्नास’ ही फिल्म दाखवली जाणार आहे. बालभारतीचे वैभव असणारे ग्रंथालय, किशोर मासिकाचे कार्यालय, पुस्तकांचा डेपो दाखविला जाणार आहे. ग्रंथालयातील सर्वात जुनं (१८६ वर्षे) १८३७ सालचं पाठ्यपुस्तक लोकांना दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर जुनी पाठ्यपुस्तक माला, इतर राज्यांची पाठ्यपुस्तके, इतर देशांची पाठ्यपुस्तके देखील दाखवली जाणार आहेत. बदलत गेलेली चित्रे, छपाई, बांधणी या सगळ्याची माहिती मिळणार आहे.
बालभारती: गुगल लोकेशन