top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 39
19-11-2023

असा झाला राज्याभिषेक (दृकश्राव्य)

मार्गदर्शक : प्रा. मोहन शेटे

रविवार 19 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी ८.४५ वाजता शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला आहे .यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने श्री शिवराज्याभिषेक या विषयावर प्राध्यापक मोहन शेटे यांचे व्याख्यान आणि राज्याभिषेक सोहळा अनुभवण्याची संधी असा दुहेरी योग या निमित्ताने साधला आहे.


बीव्हीजी इंडिया लिमिटेड, क्लब हेरिटेज आणि देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्स या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे. इतिहास प्रेमी मंडळाचे प्रमुख प्राध्यापक शेटे गेली कित्येक वर्ष इतिहास प्रेमी मंडळाच्या माध्यमातून पुणेकरांना इतिहासाशी संबंधित घडामोडी, दुर्ग प्रतिकृती यांचे दर्शन घडवत असतात. व्याख्यानानंतर रायगडावरील नगारखान्यापासून निघालेली मिरवणूक, रायगडावरील वास्तूंच्या  प्रतिकृती, दिव्यांची आकर्षक रचना पाहायला मिळणार आहे. दृकश्राव्य स्वरूपातील हा कार्यक्रम पाहण्यासाठी पन्नास रुपये शुल्क आहे.

 

नवीन मराठी शाळा, शनिवार पेठ: गुगल लोकेशन 

 

https://maps.app.goo.gl/ALZAkNeBEfCGyib78

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png
bottom of page