top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 37
04-11-2023

पुणे नगर वाचन मंदिर

मार्गदर्शक : श्री सुबोध कुलकर्णी व डॉ प्रसाद जोशी

175 वर्षे जुने असणारे हे ग्रंथालय महाराष्ट्राचे भूषण आहे .याप्रसंगी बेंगलोर येथील सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी संस्थेचे श्री सुबोध कुलकर्णी ग्रंथालय आणि मुक्त ज्ञान निर्मिती या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. पुणे नगर वाचन मंदिराचे सहकार्यवाह प्रा. डॉ. प्रसाद जोशी हे ग्रंथालय, ग्रंथालयाचे स्थलांतर, ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथ याबाबत माहिती देणार  आहेत.

7 फेब्रुवारी 1848 रोजी पुणे नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने संस्थेची स्थापना पेशव्यांच्या बुधवार वाड्यात झाली. या जागेत संस्था सुरुवातीचे 31 वर्षे होती. पुढे बुधवार वाडा जळाला त्यामुळे ग्रंथालयाचे स्थलांतर झाले .23 ऑक्टोबर 1921 रोजी पुणे नेटिव्ह जनरल लायब्ररी हे नाव बदलून पुणे नगर वाचन मंदिर असे झाले. आज ज्या इमारतीत ही संस्था आहे तेथे चैत्र शुद्ध प्रतिपदा 1 एप्रिल 1889 रोजी संस्था कायमच्या वास्तव्यासाठी आली. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी हे संस्थेच्या आद्य संस्थापकांपैकी एक होत. या हेरिटेज वॉक मध्ये ग्रंथालयातील दीडशे वर्षांपूर्वीची पुस्तके,  ग्रंथालय ,ग्रंथालयातील जुन्या तसबिरी पाहता येतील. ग्रंथालय फिरून पाहता येईल. प्राध्यापक प्रसाद जोशी हे शिक्षण क्षेत्रात गेली तीस वर्षे कार्यरत आहेत. श्री सुबोध कुलकर्णी हे मेकॅनिकल इंजिनियर असून ग्रामीण विकास, आदिवासी विकास या क्षेत्रात काम केलेले सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी सध्या  डिजिटल ज्ञान निर्मिती क्षेत्रासाठी स्वतःला वाहून घेतले आहे .

 

या स्थळावर पार्किंग उपलब्ध नाही.

 

पुणे नगर वाचन मंदिर : गुगल लोकेशन 

 

https://maps.app.goo.gl/Rm3Dv6EPFzU1mfFk9

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png
bottom of page