बीव्हीजी हेरिटेज वॉक - 36
28-10-2023
श्री ओंकारेश्वर मंदिर
मार्गदर्शक : श्री मंदार लवाटे
येत्या शनिवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सकाळी ११ वाजता पेशवाईतील एक महत्त्वाचे मंदिर असणारे श्री ओंकारेश्वर मंदिर येथे हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला आहे. पुणे शहराचे अभ्यासक श्री मंदार लवाटे या मंदिराची माहिती देणार आहेत.
शहर पुणे, खंड एक नुसार ओंकारेश्वर मंदिराची उभारणी 1760 मध्ये झाली .ओंकारेश्वर मंदिराचे विधान खूपच निराळे आहे. एका मोठ्या लंबचौकोनी जागेभोवती भिंती व कमानीच्या ओव्या, पूर्वेकडील बाजूला मोठे प्रवेशद्वार व त्यावर छोटा नगर खाना आणि पश्चिमेच्या बाजूला नऊ पाखांचे एक विस्तृत दालन, याच्या मधल्या पाखेत भगवान शंकरांची पिंड आहे. या मंदिराचे शिखर बांधकामही वेगळे आहे. शिखरामध्ये असणारी एक वेगळी खोली, शिखराच्या आजूबाजूचा परिसर लक्षवेधी आहे. मोडी लिपीचे जाणकार पुणे शहराचे अभ्यासक आणि ख्यातनाम संशोधक श्री मंदार लवाटे याप्रसंगी श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. मध्ययुगातील पुण्यातील मंदिरे ,या मंदिरांशी संबंधित असणारी मोडीतील कागदपत्रे ,पेशवाईतील बांधकामाची वैशिष्ट्ये, हेमाडपंथी मंदिरे, श्री ओंकारेश्वर चे महत्व, दीपमाळ, ओंकारेश्वर मंदिराचा परिसर अशा विविध गोष्टींवर ते प्रकाश टाकणार आहेत.
श्री ओंकारेश्वर मंदिर : गुगल लोकेशन