बीव्हीजी हेरिटेज वॉक - 32
01-10-2023
आगाखान पॅलेस
मार्गदर्शन : श्रीमती नीलम नारायण महाजन
२ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या १५४ व्या महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून, १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजता रविवारी आगाखान पॅलेस येथे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी गेली तीन दशके आगाखान पॅलेस मध्ये गाईड म्हणून मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती नीलम नारायण महाजन उपस्थितांना पॅलेसची सैर घडवून आणणार आहेत.
आगाखान पॅलेस चे बांधकाम १८९२मध्ये सुरू झाले. पॅलेसचे बांधकाम १८९७ मध्ये पूर्ण झाले. यासाठी त्या काळात सुमारे 12 लाख रुपये खर्च आला आणि एक हजार लोकांना रोजगार मिळाला. आगाखान पॅलेस ला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. प्रिन्स आगाखान तिसरे, महात्मा गांधीजी, सौ. कस्तुरबा गांधी, महात्मा गांधीजींचे मानसपुत्र महादेवभाई देसाई यांच्या कार्याची माहिती याप्रसंगी देण्यात येणार आहे. गांधीजींच्या आयुष्याशी संबंधित असणाऱ्या वस्तू, गांधीजींच्या दैनंदिन वापरातील वस्तू, कृष्णधवल छायाचित्रे, सौ कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांची समाधी या गोष्टींबद्दल महाजन मॅडम माहिती देणार आहेत.
आगाखान पॅलेस - गुगल लोकेशन