बीव्हीजी हेरिटेज वॉक - 29
10-09-2023
महात्मा फुले संग्रहालय
मार्गदर्शन : प्रा. चैताली दाभोळकर
महात्मा फुले संग्रहालय {आधीचे नाव रे म्यूझियम) भारतातील महाराष्ट्राच्या पुणे शहरातले एक वस्तुसंग्रहालय आहे. या संग्रहालयाची स्थापना १८९० मध्ये झाली. तेव्हा हे 'पूना औद्योगिक संग्रहालय' म्हणून ओळखले जात असे. त्यानंतर याला 'लॉर्ड रे संग्रहालय' असे नाव देण्यात आले. इ.स. १९६८ मध्ये ह्या संग्रहालयाचे नाव बदलून महात्मा फुले संग्रहालय असे झाले. सुरुवातीला पुण्यातील (भाजी) मंडईच्या वरच्या मजल्यावर असलेले हे संग्रहालय नंतर घोले रोडवर गेले.
१८७५ पासूनच या संग्रहालयाचा इतिहास आपल्याला सापडतो. या संग्रहालयात आठ दालने विविध विषयांना वाहिलेली आहेत. यात उद्योग आणि अभियांत्रिकी, भूगर्भशास्त्र आणि खनिजे, हस्तकला आणि कुटिरोद्योग, शेती, वन, वनस्पतीविज्ञान ,निसर्ग इतिहास, शस्त्रास्त्रे या व्यतिरिक्त, आधुनिक काळातील काही तैल अथवा जल रंगातील चित्रे व शिल्पे ही प्रदर्शनात मांडण्यात आलेली आहेत. संग्रहालयास नाममात्र शुल्क आहे.
गुगल लोकेशन