बीव्हीजी हेरिटेज वॉक - 28
03-09-2023
आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट
मार्गदर्शन : डॉ. मंदार दातार व डॉ गुरुदत्त वाघ
पुण्यातील आघारकर संशोधन संस्था ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदानित स्वायत्त संस्था असून ती पुणे विद्यापीठ व ,महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाशी संलग्न असून त्यांचे जीवशास्त्राशी संबंधीत पदव्युत्तर व पीएच.डी.चे अभ्यासक्रम राबवते. त्या शिवाय ही संस्था भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने जैवविज्ञानाशी संबधित संशोधन प्रकल्प हाती घेते.
आघारकर संशोधन संस्थेची- Agharkar Research Institute (ARI)-स्थापना १९४६ मध्ये महाराष्ट्र ॲसोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस (MACS) नावाने झाली. ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉ शंकर पुरुषोत्तम आघारकर यांनी या संस्थेची स्थापना केली. १९९२ मध्ये संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले.
प्राध्यापक शंकर पुरुषोत्तम आघारकर हे पहिले संचालक होत. यावेळी संस्थेचा इतिहास, संस्थेचे वर्तमान कार्य, विशिष्ट वनस्पतींची माहिती, परसबाग बगीचा वर्ग याची माहिती दिली जाणार आहे.
गुगल लोकेशन
https://maps.app.goo.gl/By5DyEbsJeZwBFLk9