बीव्हीजी हेरिटेज वॉक - 27
27-08-2023
केसरी वाडा
मार्गदर्शन : प्रा. श्री गणेश राऊत सर
गायकवाडवाडा हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या नारायण पेठेतील वाडा आहे. या वाड्यात बाळ गंगाधर टिळकांचे वास्तव्य होते. हा वाडा लोकमान्य टिळकांनी १९०५ साली विकत घेतला. केसरी व मराठा या वृत्ततपत्रांची कार्यालयेही या वाड्यात हलवली. टिळकांनी स्थापन केलेल्या केसरी वृत्तपत्राचे कार्यालयही याच वाड्यात आहे. याच वाड्याला टिळक वाडा अथवा केसरी वाडा असेही म्हणतात.
बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बाळ गंगाधर टिळकांना हा वाडा विकत दिला. या वाड्यात येण्यापूर्वी लोकमान्य टिळक सरदार विंचूरकर वाड्यात वास्तव्य करत असत.
या वाड्यास जसा टिळकवाद्यांचा सहवास लाभला तसाच लोकमान्य टिळकांचे पुत्र हे सुधारणावादी आणि रविकिरण मंडळ यात आघाडीत असल्यामुळे सुधारणावादी चळवळी आणि काव्य वाचनांचाही लाभ झाला.
सौजन्य : विकिपीडिया
वॉकप्रसंगी लोकमान्य टिळकांचे निवासस्थान, लोकमान्य टिळकांच्या जीवनाशी संबंधित छायाचित्रे, केसरी वाड्यातील गणेशोत्सव ,जर्मनीतील स्टुटगार्ड येथे ख्यातनाम देशभक्त भिकाई कामा यांनी फडकविलेला ध्वज इत्यादी विषयी माहिती दिली जाईल.
केसरी वाडा गुगल लोकेशन