बीव्हीजी हेरिटेज वॉक - 26
20-08-2023
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक - मामलेदार कचेरी
मार्गदर्शन : श्री सुनील जाधव
१८१८ ला ब्रिटिशांचे राज्य भारतात स्थापित झाले. त्यांच्या विरोधात सुरुवातीला जे क्रांतिकार्य झाले त्यातील सगळ्यात महत्त्वाचे क्रांतिकारक म्हणजे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक. राजे उमाजी नाईक यांच्या कार्याची माहिती जाणून घेण्यासाठी 20 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळात हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आलेले आहे.
या हेरिटेज वॉक मध्ये राजे उमाजी नाईक यांच्या कार्याविषयी संशोधन करणारे श्री सुनील जाधव हे माहिती देणार आहेत. मामलेदार कचेरीच्या परिसरातील जेल, राजे उमाजी नाईक यांच्या फाशीचे ठिकाण, अंधार कोठडी आणि राजे उमाजी यांचे जीवन या सगळ्या गोष्टींना याप्रसंगी उजाळा देण्यात येणार आहे. श्री सुनील जाधव हे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, हुतात्मा स्मारक, महाराष्ट्र राज्य या समितीचे सचिव आहेत ते संगणक शाखेतील तज्ञ असून युवकांना उद्योग व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन करतात .आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक या विषयावर संशोधन करीत आहेत .इतिहास प्रेमी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मोहन शेटे हे विविध ऐतिहासिक साहित्यातून उमाजींची दिसणारी प्रतिमा या संदर्भात श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. एच .व्ही .देसाई महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गणेश राऊत याप्रसंगी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा आढावा आणि ब्रिटिशांची राजवट या देशात राज्यकर्ते का ठरली? यासंदर्भात श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या हेरिटेज वॉकचे निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्या हुतात्म्यांच्या कार्यावरती प्रकाश टाकण्यासाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मामलेदार कचेरी गुगल लोकेशन