बीव्हीजी हेरिटेज वॉक - 18
18-06-2023
भारत इतिहास संशोधक मंडळ
मार्गदर्शन : जेष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे
येत्या 18 जून2023 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे सकाळी आठ वाजता बीवीजी हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विकास ढाकणे अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका असणार आहेत.
भारत इतिहास संशोधक मंडळ हे प्रामुख्याने भारतीय इतिहासाचा अभ्यास करणारे मंडळ आहे. या मंडळाची स्थापना ७ जुलै, इ.स. १९१० रोजी इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी पुणे येथे केली.
भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये २०१९ अखेर १५ लाखांहून अधिक ऐतिहासिक कागदपत्रे आणि मराठी (देवनागरी आणि मोडी), फारसी, पोर्तुगीज आणि इंग्रजी भाषेतली ३०,००० हस्तलिखिते आहेत. मंडळाच्या सुसज्ज संग्रहालयात चार हजाराहून अधिक जुनी नाणी एक हजार रंगीत चित्रे आणि काही शिल्पे व शिलालेख जतन करून ठेवली आहेत. मंडळाच्या ग्रंथालयातील २७,०००हून अधिक इंग्रजी-मराठी पुस्तके संशोधकांना तेथेच विनामूल्य वाचनासाठी किंवा घरी नेऊन वाचण्यासठी नाममात्र फीमध्ये उपलब्ध होत आहेत. ही संसाधने प्रामुख्याने मराठा साम्राज्य, मराठा संस्कृती आणि मराठी इतिहासावरची आहेत. भारतावरील मुगल आणि ब्रिटिश साम्राज्यावरील साहित्याचा मोठा संग्रहही त्यांत आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळ गुगल लोकेशन