बीव्हीजी हेरिटेज वॉक - 17
11-06-2023
आनंदाश्रम संस्था
मार्गदर्शन : श्रीमती अपर्णा आपटे
पुण्याच्या मध्यवस्तीतील हेरिटेजचे एक वैभव म्हणजे आनंदाश्रम. आप्पा बळवंत मेहंदळे चौकात असणाऱ्या या वास्तूत दिनांक 11 जून रोजी सकाळी नऊ वाजता हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला आहे. आनंदाश्रमच्या विश्वस्त अपर्णा आपटे या उपस्थितांना माहिती देणार आहेत.
या हेरिटेज वॉक मध्ये मंदिर, संग्रहालय, दुर्मिळ संस्कृत हस्तलिखिते पाहता येणार आहेत. शके १३७१ पासूनची ही हस्तलिखिते आहेत. याचा अर्थ १५ व्या शतकातील (आजपासून ६०० वर्षे जुनी) हस्तलिखिते बघायला मिळणार आहेत.
हेरिटेज वॉक मध्ये पाहण्यासाठी भास्कराचार्य, कालिदास, पाणिनी, पतंजलि आणि व्यास यांच्या वेद, वेदांग ज्योतिष, गणित, आयुर्वेद, शिल्पवास्तू शास्त्र, व्याकरण, उपनिषदे, काव्य, याज्ञिक धर्मशास्त्र आदी विषयांवरील दुर्मीळ संस्कृत हस्तलिखितांचा समावेश असणार आहे.
या प्रसंगी श्री. महादेव चिमणाजी आपटे, ह. ना. आपटे यांचे कार्य जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. संस्कृतची उन्नती हेच आनंदाश्रम संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.. याच वेळी आश्रमाच्या आवारात सुनिधी पब्लिशर्सच्या वतीने अविनाश काळे संवाद साधणार आहेत.
गुगल लोकेशन