बीव्हीजी हेरिटेज वॉक - 16
04-06-2023
केंद्रीय मधुमक्षिका संशोधन
व प्रशिक्षण संस्था
मार्गदर्शन : श्री सुनील पोकरे साहेब
पृथ्वीवरील मधमाशांचा नाश झाला तर मानवाचाही अंत होईल असे, आईन्स्टाईन या प्रख्यात शास्त्रज्ञाने सांगितले आहे. मधमाशांच्या परागीभवनाच्या माध्यमातून पीक उत्पादनात वाढ घडून येते .मधमाशांचे जीवन आणि मधमाशी पालन या संदर्भात प्रबोधन करण्यासाठी दिनांक 4 जून रोजी केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था, शिवाजीनगर येथे हेरिटेज वॉक आयोजन करण्यात आले आहे . सकाळी आठ वाजता हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी संस्थेचे सहसंचालक श्री सुनील मधुकर पोकरे हे माहिती देणार आहेत.
5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो. मधमाशी मानव जातीशी सर्वाधिक जवळचा जीव आहे .मधमाशांचे कार्य जाणून घेण्याची या निमित्ताने संधी उपलब्ध झाली आहे .संस्थेचे सध्या हीरक महोत्सवी वर्ष चालू आहे. हेरिटेज वॉक मध्ये संग्रहालय ,ग्रंथालय, प्रयोगशाळा ,मधु प्रशोधन यंत्र, मेण पत्रा ,मधमाशी वसाहतीचे प्रत्यक्ष दर्शन आणि हनी पार्लर इत्यादी गोष्टी दाखविण्यात येणार आहेत .
गुगल लोकेशन